आज दिनांक 03.10.2023 रोजी वर्ल्ड ट्रेड सेंटर, मुंबई येथे जागतिक दर्जाचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते सदर प्रदर्शनामध्ये ते 20 ते 23 देशातील उद्योजकांनी व कौन्सिलेट जनरल यांनी सहभाग घेतला असून शासकीय व निमशासकीय विभाग, खाजगी उद्योजक यांच्यासह 100 स्टॉल लावण्यात आले आहेत. सदर प्रदर्शनात महामंडळाचा कोल्हापूर चप्पलचे मार्केटिंग, प्रमोशन व विक्री करता स्टॉल लावण्यात आला आहे. सदर स्टॉलला मा. व्यवस्थापकीय संचालक श्री. धम्मज्योती गजभिये साहेब यांनी भेट दिली, मा. व्यवस्थापकीय संचालक श्री. धम्मज्योती गजभिये साहेब यांचे कौन्सिल फॉर लेदर एक्सपोर्टचे रिजनल डायरेक्टर श्री. संतोष पांडे व धारावी येथील उद्योजक श्री गणेश डोईफोडे व यांनी स्वागत केले. यानंतर, मा. व्यवस्थापकीय संचालक यांनी प्रदर्शनातील विविध देशांच्या स्टॉलला जाऊन प्रत्यक्षात भेट दिली, कोल्हापुरी चप्पलचे जास्तीत जास्त मार्केटिंग, प्रमोशन व एक्स्पोर्ट करण्याकरिता पाठपुरावा व प्रयत्न केला. सायंकाळी सदर प्रदर्शनामध्ये फॅशन शो मध्ये कोल्हापुरी चप्पल नाचे मयुरीचे रॅम्प वॉक करण्यात आले, यामुळे कोल्हापुरी चप्पल प्रचंड प्रसिध्दी मिळाली.