श्री. सुमंत भांगे साहेब(आयएएस) मा. सचिव, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, यांच्या अध्यक्षतेखाली मा. व्यवस्थापकीय संचालक श्री. धम्मज्योती गजभिये साहेब आणि चर्मकार विकास संघ व चर्मद्योग कामगार सेना यांचे अध्यक्ष व संघटनाचे महत्त्वाचे पदाधिकारी यांच्या समवेत बैठक आयोजित करण्यात आली.
सदर बैठकीत चर्मकार समाज बांधवांच्या विविध मागण्या व अडीअडचणी व्यवस्थितपणे समजून घेतल्या. मा. व्यवस्थापकीय संचालक श्री. धम्मज्योती गजभिये साहेब यांनी अडचणीचे व्यवस्थित उपाययोजना व महामंडळ करत असलेले विविध प्रकल्प, प्रशिक्षनाद्वारे चर्मकार समाजाचे आर्थिक व सामाजिक विकास करण्याचे आश्वासन दिले.
मा. सचिव साहेब यांनी लिडकॉम् महामंडळ सर्व चर्मकार समाजाचे आर्थिक, सामाजिक उत्थान करण्यासाठी बांधील आहे, असे आश्वासन दिले
महाराष्ट्र शासनाने कंपनी कायदा १९५६ अंतर्गत चर्मोद्योग व या उद्योगात कार्यरत असणाऱ्या लोकांना प्रोत्साहन आणि चालना देण्याच्या उद्देशाने या महामंडळाची स्थापना केली.
महाराष्ट्र शासनाने कंपनी कायदा १९५६ अंतर्गत चर्मोद्योग व या उद्योगात कार्यरत असणाऱ्या लोकांना प्रोत्साहन आणि चालना देण्याच्या उद्देशाने या महामंडळाची स्थापना केली.
© LIDCOM 2024. All Rights Reserved
Website Maintained by Deepminds Infotech Pvt. Ltd.