चामड्याच्या वस्तूंची बाजारपेठ निर्मिती व उन्नतीसाठी केंद्र शासनाच्या चर्मोद्योगात कार्यरत असणाऱ्या विविध संस्थांशी चर्चा झाली. त्या अनुषंगाने महाराष्ट्रातील चर्मोद्योगाचा विकास, संवर्धन व प्रोत्साहन करण्यासाठी तसेच या क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील. चेन्नई येथील ‘केंद्रीय चामडे संशोधन संस्थेसह’ संयुक्तपणे महाराष्ट्रातील चर्मोद्योगचे सर्वेक्षण करण्याबाबत सामंजस्य करार करण्यात आला आहे, तसेच ‘लेदर क्लस्टर च्या स्थापनेसाठीचा निर्णय घेण्यासाठी अभ्यास गटाची नियुक्ती आणि इतर राज्यातील प्रशिक्षण व अनेक चांगल्या धोरणांचा अवलंब महाराष्ट्रात करण्यासाठी ची शिफारस करण्यात आली.
यासोबतच ‘कौन्सिल फॉरलेदर एक्स्पोर्ट’, सेन्ट्रल फुटवेयर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट , लेदर सेक्टर स्कील कौन्सिल इ. केंद्र स्तरीय संस्थांच्या सहाय्याने महाराष्ट्रात देखील विविध विषयांवर प्रशिक्षण आणि डिझाईन केंद्रे सुरु करण्याबाबत ची कार्यवाही केली जाईल. लिडकॉममार्फत या सर्व प्रस्तावावर लवकरच काम सुरु करण्यात येईल आणि महामंडळाच्या या ‘सुवर्ण महोत्सवी’ वर्षात चर्मकार समाजाच्या उन्नतीसाठी लिडकॉमचे हे प्रयत्न यशस्वी होतील अशी आशा आहे, असे मत मा. व्यवस्थापकीय संचालकांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र शासनाने कंपनी कायदा १९५६ अंतर्गत चर्मोद्योग व या उद्योगात कार्यरत असणाऱ्या लोकांना प्रोत्साहन आणि चालना देण्याच्या उद्देशाने या महामंडळाची स्थापना केली.
महाराष्ट्र शासनाने कंपनी कायदा १९५६ अंतर्गत चर्मोद्योग व या उद्योगात कार्यरत असणाऱ्या लोकांना प्रोत्साहन आणि चालना देण्याच्या उद्देशाने या महामंडळाची स्थापना केली.
© LIDCOM 2024. All Rights Reserved
Website Maintained by Deepminds Infotech Pvt. Ltd.