‘पादुका डिझाईन आणि विकास संस्था ही शिक्षण प्रदान करण्यात तसेच पादत्राणे, चामड्याच्या वस्तू व जीवनशैली शी संबंधित क्षेत्रातील कौशल्यामध्ये असणारी तफावत भरून काढण्यात महत्वाची भूमिका बजावत आहे. तसेच ही संस्था राष्ट्र उभारणीत देखील सातत्याने योगदान देत असल्याने एफडीडीआय ला २०१७ सालच्या एफडीडीआय कायद्यांतर्गत ‘महत्वाची राष्ट्रीय संस्थे’ चा दर्जा देण्यात आला आहे. एफडीडीआय ही एक प्रमुख शैक्षणिक व प्रशिक्षण देणारी संस्था असून ती पादत्राणे व उत्पादन, चामड्याची उत्पादने, किरकोळ किंवा शृंगारा साठीच्या वस्तू आणि फॉशन डिझाईन क्षेत्रांच्या विकासासाठी व वृद्धीसाठी समर्पित आहे.
देशभरात पसरलेल्या १२ आधुनिक प्रशिक्षण केंद्रासह एफडीडीआय ची भारतभर उपस्थिती आहे. या केंद्रांमध्ये जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा आणि इतर सुविधा (अत्याधुनिक मशिनरी व उपकरणांसह कार्यशाळा, हायटेकआयटी लॉब, स्मार्ट क्लास रूम , हाय एंड प्रोडक्ट डेव्हलपमेंट सेंटर, कोम्प्रेहेन्सीव लायब्ररी, ऑडीटोरियम व स्पोर्ट्स सुविधा) यांचा समावेश आहे. या सर्व अत्याधुनिक सुविधांसह आंतरराष्ट्रीय स्तरावरील उच्च शिक्षण, चामड्यांची उत्पादने, पादत्राणे व प्रशिक्षण, किरकोळ आणि संबंधित उद्योगांसाठी आवश्यक असणाऱ्या अशा सर्व प्रकारे आंतरराष्ट्रीय मानकांची शाश्वती देणाऱ्या सोईसुविधा या एकाच छताखाली आणण्याचे प्रमुख कार्य या संस्थेमार्फत पार पडले जाते.
महाराष्ट्र शासनाने कंपनी कायदा १९५६ अंतर्गत चर्मोद्योग व या उद्योगात कार्यरत असणाऱ्या लोकांना प्रोत्साहन आणि चालना देण्याच्या उद्देशाने या महामंडळाची स्थापना केली.
महाराष्ट्र शासनाने कंपनी कायदा १९५६ अंतर्गत चर्मोद्योग व या उद्योगात कार्यरत असणाऱ्या लोकांना प्रोत्साहन आणि चालना देण्याच्या उद्देशाने या महामंडळाची स्थापना केली.
© LIDCOM 2024. All Rights Reserved
Website Maintained by Deepminds Infotech Pvt. Ltd.