संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्यादित ची स्थापना १ मे १९७४ रोजी झाली. सुरुवातील ५ कोटी रु. असलेले शासकीय भाग भांडवल जी.आर.क्रं. १०९७/१३१५४/SCP२ नुसार दि. १० मार्च १९९८ पर्यंत ५० कोटींपर्यंत वाढले. ३१ मार्च २००७ पर्यंत LIDCOM चे शासकीय भाग भांडवल ७३.२१ कोटी रु. एवढे आहे.राज्य शासनाचा भाग भांडवलात १००% हिस्सा आहे. महाराष्ट्र शासन निर्णय क्रं. LID/ १०९५/६४६१/IND-५ नुसार, लिडकॉम ला उद्योग विभागकडून समाज कल्याण, सांस्कृतिक कार्य व क्रीडा विभागाच्या नियंत्रणाखाली आणण्यात आले आहे. चार्मोद्योगाच्या विकासात कार्यरत असणाऱ्या समुदायास आर्थिक सहाय्य देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्यातील अनुसूचित जाती प्रवर्गाची सामाजिक व आर्थिक उन्नती व्हावी यासाठी सध्या कार्यरत
असलेल्या संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळात समाविष्ट असणाऱ्या होलार
समाजाच्या सामाजिक व आर्थिक विकासासाठी संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास
महामंडळांतर्गत उपकंपनी स्थापन करण्यास शासन मान्यता देत आहे. सदरची उपकंपनी “होलार
समाज आर्थिक विकास महामंडळ (संत रोहीदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाची उपकंपनी)”
या नावाने संबोधले जाईल. सदर उपकंपनीचे कामकाज हे संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास
महामंडळाकडून चालविण्यात येईल.
१. | शासन नियुक्त पदाधिकारी संत रोहिदास धर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्या., मुंबई यांचे अध्यक्ष | अध्यक्ष |
२. | शासन नियुक्त पदाधिकारी संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्या., मुंबई यांचे उपाध्यक्ष | उपाध्यक्ष |
३. | मा.अपर मुख्य सचिव / मा.प्रधान सचिव / मा. सचिव सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, मंत्रालय, मुंबई | संचालक |
४. | मा. सहसचिव /मा.उपसचिव सामाजिक न्याय व विशेष सहाय्यविभाग, मंत्रालय, मुंबई | संचालक |
५. | व्यवस्थापकीय संचालक संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्या.मुंबई | संचालक तथा व्यवस्थापकीय संचालक |
६. | अशासकीय सदस्य – ३ | संचालक |
महाराष्ट्र शासनाने कंपनी कायदा १९५६ अंतर्गत चर्मोद्योग व या उद्योगात कार्यरत असणाऱ्या लोकांना प्रोत्साहन आणि चालना देण्याच्या उद्देशाने या महामंडळाची स्थापना केली.
महाराष्ट्र शासनाने कंपनी कायदा १९५६ अंतर्गत चर्मोद्योग व या उद्योगात कार्यरत असणाऱ्या लोकांना प्रोत्साहन आणि चालना देण्याच्या उद्देशाने या महामंडळाची स्थापना केली.
© LIDCOM 2024. All Rights Reserved
Website Maintained by Deepminds Infotech Pvt. Ltd.