English

आगामी प्रकल्प

कोल्हापूर येथे चर्मोद्योग प्रशिक्षण केंद्राची स्थापना

राज्य शासनाने लिडकॉम आणि सीएफटीआय आग्रा यांच्या संयुक्त विद्यमाने कोल्हापूर येथे ‘चर्मोद्योग प्रशिक्षण संस्था ’ उभारण्यास मंजुरी दिली आहे. इमारतीचा बांधकाम नकाशा तयार करण्याचे काम सुरु करण्यात आले असून ते लवकरच पूर्णत्वास येईल. तसेच याबाबत तांत्रिक संमती मिळविण्यासाठी कोल्हापूर महापालिकेकडे अर्ज करण्यात आला आहे.

रातवड (जि. रायगड) येथे चामड्याचे क्लस्टर उभारणे
केंद्र शासनाच्या भारतीय पादुका व उपकरणे विकास कार्यक्रम अंतर्गत महाराष्ट्रात ‘ मेगा लेदर फुटवेअर आणि अक्सेसरीस क्लस्टर’ सुरु करण्यात आले आहे. यासाठी रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील रातवड येथील १५० एकर भू-संपादनाचा प्रस्ताव केंद्र सरकारकडून एमआयडीसी यांच्या मार्फत मंजुरी मिळाली आहे.
गटई स्टॉल योजनेच्या नेटवर्कचा विस्तार वाढविणे

गटई कामगारांना मोफत गटई स्टॉल उपलब्ध करून देण्यासाठी सरू करण्यात आलेल्या या योजनेंतर्गत २००७-०८ ते २०१८-१९ या कालावधीत २५१२७ लाभार्थ्यांना गटई  स्टॉल चे वाटप करण्यात आले आहे. या योजनेसाठी २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी ७ कोटी रु. ची अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली असून एकूण १७५० लाभार्थ्यांना गटई  स्टॉल वाटप करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

जीआय टॅग प्रमाणपत्रांमध्ये ४ जिल्ह्यांचा समावेश करणे

 कोल्हापुरी चप्पल साठी महामंडळास जीआय (Geographical Indication Registration Certificate) प्रमाणपात्र मिळाले आहे. याच धर्तीवर महाराष्ट्रातील ४ जिल्हे (कोल्हापूर, सोलापूर, सातारा व सांगली ) आणि कर्नाटक मधील ४ जिल्हे ( बेळगाव, धारवाड, बागलकोट आणि विजापूर ) यांना जीआयआर प्रमाणपात्र मिळविण्यासाठी प्रयत्नशील राहणे.

देवनार येथे मुख्य कार्यालय आणि केंद्रीय पादुका प्रशिक्षण केंद्र सुरु करणे

 मुंबईतील देवनार येथे लिडकॉम चे मुख्यालय आणि ‘मध्यवर्ती पादुका प्रशिक्षण केंद्र ’ सुरु करण्याचा प्रस्ताव महामंडळाच्या विचाराधीन आहे. देवनार येथील सिटी सर्वे क्र. ९३ / १ अ मधिल महामंडळाच्या ताब्यातील २ एकर भूखंड आहे. चर्मोद्योगाची संबंधित कारागीरांकरीता लेदर पार्क गाळे तयार करणे, लेदर हब, लेदर क्लस्टर करणे, एक्स्पोर्ट युनिट व वसतीगृह तयार करण्याचे प्रस्तावित आहे.

सोशल मेडिया

महाराष्ट्र शासनाने कंपनी कायदा १९५६ अंतर्गत चर्मोद्योग व या उद्योगात कार्यरत असणाऱ्या लोकांना प्रोत्साहन आणि चालना देण्याच्या उद्देशाने या महामंडळाची स्थापना केली.

महाराष्ट्र शासनाने कंपनी कायदा १९५६ अंतर्गत चर्मोद्योग व या उद्योगात कार्यरत असणाऱ्या लोकांना प्रोत्साहन आणि चालना देण्याच्या उद्देशाने या महामंडळाची स्थापना केली.

महाराष्ट्र शासनाने कंपनी कायदा १९५६ अंतर्गत चर्मोद्योग व या उद्योगात कार्यरत असणाऱ्या लोकांना प्रोत्साहन आणि चालना देण्याच्या उद्देशाने या महामंडळाची स्थापना केली.

© LIDCOM 2024. All Rights Reserved

Website Maintained by Deepminds Infotech Pvt. Ltd.