English

केंद्र शासनाच्या योजना

आगामी योजना:

(१) सरकारी योजना मेळावा (लिडकॉम लाभार्थ्यांचे ३००० ते ४००० प्रस्ताव निकाली काढण्यासाठी -प्रस्तावित) | (२) नवीन महिला सक्षमीकरण | (३) महिला संपत्ती योजना

लघु ऋण योजना

या योजनेंतर्गत चर्मकार समाजातील लाभार्थ्यांना ५% प्रति वर्ष व्याज दराने १,४०,०००० रु. पर्यंतची प्रकल्प रक्कम कर्ज स्वरुपात दिली जाते. या रकमेतील ३१००० रु. अनुदान म्हणून , ४००० रु. लाभार्थी सहभाग आणि उर्वरित रक्कम ही कर्जाच्या स्वरुपात एन.एस.एफ.डी.सी मार्फत दिली जाते. या योजनेसंबंधीचा अर्ज हा लिडकॉम च्या जिल्हा कार्यालयात उपलब्ध होतो.

महिला समृद्धी योजना

या योजनेंतर्गत चर्मकार समाजातील सर्व महिला तसेच विधवा, विभक्त महिला (प्राथमिकता देण्यात येते) यांना १,४०,००० रु. पर्यंत आर्थिक सहाय्य केले जाते , ज्यापैकी ३१००० रु. हे अनुदानाच्या स्वरुपात, ४००० रु. लाभार्थी सहभाग आणि उर्वरित १,३५,००० रु. रक्कम ही कर्जाच्या स्वरुपात एन.एस.एफ.डी.सी मार्फत दिली जाते. यामधील कर्जाचा व्याजदर ४% असून यासंबंधीचे अर्ज हे लिडकॉम च्या जिल्हा कार्यालयात उपलब्ध होतो.

शैक्षणिक कर्ज

नवी दिल्ली स्थित एन.एस.एफ.डी.सी मार्फत २००९ सालापासून ही योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत भारतातील पदवीत्तर शिक्षणासाठी ३० लाख रु. पर्यंतचे, तर परदेशी पदवीत्तर शिक्षणासाठी ४० लाख रु. पर्यंतचे शैक्षणिक कर्ज दिले जाते. या अंतर्गत भारतातील पदवीत्तर शिक्षणासाठी महिलांना ५.५% तर पुरुषांना ६% व्याज दराने; तर परदेशी पदवीत्तर शिक्षणासाठी महिलांना ६.५% तर पुरुषांना ७% व्याज दराने कर्ज पुरवठा केला जातो. या शैक्षणिक कर्जाचा परतफेड कालावधी हा १० लाखापर्यंतच्या कर्जासाठी १० वर्षे तर त्यापुढील कर्जासाठी १२ वर्षे एवढा आहे.

महिला किसान योजना

या योजनेंतर्गत ७/१२ उतारा स्वतःच्या नावावर असणाऱ्या किंवा पतीसह ७/१२ उताऱ्यात नाव असणाऱ्या किंवा ७/१२ नावावर असणाऱ्या पुरुषाने आपल्या पत्नीच्या नावे शेती व्यवसाय करण्यासाठी प्रतिज्ञापत्र दिले असेल अशा सर्व चर्मकार समाजातील महिलांना ५% वार्षिक व्याज दराने ५०००० रु. पर्यंतचे कर्ज देण्यात येत असून त्यापैकी १०००० रु. अनुदान तर उर्वरित ४०००० रक्कम ही कर्जाच्या स्वरुपात दिली जाते.

मुदत कर्ज योजना

या योजनेंतर्गत लिडकॉम मार्फत चर्मकार समाजातील लाभार्थ्यांना विविध व्यवसाय सुरु करण्यासाठी कर्जाचे वितरण केले जाते. एन.एस.एफ.डी.सी मार्फत विविध योजनांसाठी १,००,००० ते ५,००,००० रु. पर्यंतचे मुदत कर्ज प्रदान केले जात आहे. एकूण प्रकल्पाच्या ७५% कर्ज हे एन.एस.एफ.डी.सी मार्फत साधारणपणे ७% व्याज दरात , तर महामंडळामार्फत १०००० रु. अनुदानासह प्रकल्पाच्या २०% कर्ज हे ४% व्याज दरात दिले जाते. यामध्ये लाभार्थ्यांचा सहभाग हा प्रकल्प रकमेच्या ५% एवढा असतो.

न. स. फ. डी. सी. योजना

अनुसूचित जमातीसाठी सोनेरी अवसर

महिला अधिकारिता योजना

या योजनेंतर्गत लिडकॉम मार्फत चर्मकार समाजातील महिलांना विविध व्यवसाय सुरु करण्यासाठी कर्जाचे वितरण केले जाते. एन.एस.एफ.डी.सी मार्फत विविध योजनांसाठी ५,००,००० रु. पर्यंतचे मुदत कर्ज प्रदान केले जाते. एकूण प्रकल्पाच्या ७५% कर्ज हे एन.एस.एफ.डी.सी मार्फत साधारणपणे ६% व्याज दरात , तर महामंडळामार्फत १०००० रु. अनुदानासह प्रकल्पाच्या २०% कर्ज हे ४% व्याज दरात दिले जाते. यामध्ये लाभार्थ्यांचा सहभाग हा प्रकल्प रकमेच्या ५% एवढा असतो.

सुविधा कर्ज योजना

या योजनेंतर्गत चर्मकार समाजातील लाभार्थ्यांना १० लाख रु. पर्यंतच्या प्रकल्पांसाठी आर्थिक सहाय्य केले जाते. या अंतर्गत प्रकल्प रकमेच्या ९०% रक्कम ही कर्जाच्या स्वरुपात प्रदान केली जाते. एन.एस.एफ.डी.सी मार्फत हे कर्ज ८% व्याजदरात उपलब्ध करून दिले जाते आणि याचा परतफेड कालावधी हा ५ वर्षांचा आहे. या योजनेंतर्गत कर्जाचा स्थगिती कालावधी हा वृक्षारोपण व बांधकाम व्यवसायासाठी १२ महिने , तर इतर व्यवसायांसाठी ६ महिने एवढा करण्यात आलेला आहे.

उत्कर्ष कर्ज योजना

या योजनेंतर्गत चर्मकार समाजातील लाभार्थ्यांना १० लाख ते ५० लाख रु. पर्यंतच्या प्रकल्पांसाठी आर्थिक सहाय्य केले जाते. या अंतर्गत प्रकल्प रकमेच्या ९०% रक्कम ही कर्जाच्या स्वरुपात प्रदान केली जाते. एन.एस.एफ.डी.सी मार्फत हे कर्ज ९% व्याजदरात उपलब्ध करून दिले जाते आणि याचा परतफेड कालावधी हा ७ वर्षांचा आहे. या योजनेंतर्गत कर्जाचा स्थगिती कालावधी हा वृक्षारोपण व बांधकाम व्यवसायासाठी १२ महिने , तर इतर व्यवसायांसाठी ६ महिने एवढा करण्यात आलेला आहे.

महिला किसान योजना

या योजनेंतर्गत ७/१२ उतारा स्वतःच्या नावावर असणाऱ्या किंवा पतीसह ७/१२ उताऱ्यात नाव असणाऱ्या किंवा ७/१२ नावावर असणाऱ्या पुरुषाने आपल्या पत्नीच्या नावे शेती व्यवसाय करण्यासाठी प्रतिज्ञापत्र दिले असेल अशा सर्व चर्मकार समाजातील महिलांना ५% वार्षिक व्याज दराने ५०००० रु. पर्यंतचे कर्ज देण्यात येत असून त्यापैकी १०००० रु. अनुदान तर उर्वरित ४०००० रक्कम ही कर्जाच्या स्वरुपात दिली जाते.

मुदत कर्ज योजना

या योजनेंतर्गत लिडकॉम मार्फत चर्मकार समाजातील लाभार्थ्यांना विविध व्यवसाय सुरु करण्यासाठी कर्जाचे वितरण केले जाते. NSFDC मार्फत विविध योजनांसाठी १००००० ते २५०००० रु. पर्यंतचे मुदत कर्ज प्रदान केले जात आहे. एकूण प्रकल्पाच्या ७५% कर्ज हे NSFDC मार्फत तर महामंडळामार्फत प्रकल्पाच्या २०% कर्ज आणि १०००० रु. पर्यंतचे अनुदान दिले जाते.

Promote & boost the Leather Industry and people engaged in Leather Industry of the Maharashtra State, Government of Maharashtra has established a company under the Company Act, 1956.

Promote & boost the Leather Industry and people engaged in Leather Industry of the Maharashtra State, Government of Maharashtra has established a company under the Company Act, 1956.

© LIDCOM 2024. All Rights Reserved

Website Maintained by Deepminds Infotech Pvt. Ltd.

Enquiry Now